जगण्यातला आनंद लुटता आला पाहिजे,
त्यासाठी मनभरून जगले पाहिजे....
कोणाचीही चिंता न करता आपलाच आनंद शोधता आला पाहिजे,
कोणी स्वार्थी म्हंटल तर काय झालं,
आपलं आयुष्य शेवटी आपल्यालाच सजवता आलं पाहिजे....
कोणाची साथ मिळेल मग सजवता येईल असा म्हणण्यापेक्षा,
कोणालाही आपल्या आयुष्यात येण्याचा मोह होईल असे आपण बनले पाहिजे.....
नेहमीच हसले पाहिजे पण कधीतरी रडलेहि पाहिजे,
या आयुष्यात रंग भरण्यासाठी खोड्याही केल्या पाहिजेत....
कोणाला तरी मदत केली पाहिजे, कधीतरी कोणाला फसवलंही पाहिजे,
या जगातून जाण्याअगोदर जगातील साऱ्या गोष्टी आणि क्षण अनुभवले पाहिजे.....
जास्त काही नाही पण या जगात जन्म घेतल्याचे सार्थक झाले पाहिजे,
स्वर्ग नाही भेटला तरी खंत नाही, पण कमीतकमी नर्क टाळता आला पाहिजे......
No comments:
Post a Comment