आठवणी त्या गेल्या वाहून का तुझ्या अश्रू मधून....
कि आठवतो पुसट पुसट चेहरा माझा अजून....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....
घालवले जे सोबत आपण त्या क्षणांची ....
आणि घालवू नाही शकलो जे क्षण सोबत.....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....
पुढ्यात ताट आणि मनात येतो का माझा विचार....
पुन्हा मागे नाही असं म्हणत म्हणतेस का एखादा सुविचार....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....
विचारात लक्ष न लागे कधी त्या जेवणावर....
जेवताना कधी तो घास अडतो का ओठांवर....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....
डोळ्यातून वाहते का ग कधी अश्रूंची धार....
पण अडवून पुन्हा करतेस माझाच विचार....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....
आठवणीत फिरता कधी थांबतेस का त्या जागी येऊन....
ज्या ठिकाणी कधी भेटायचो आपण लपून छपून....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....
कधी प्रेम तर कधी भांडण आपली अधून मधून....
तुझी नजर चहू ओर कोणीतरी बघेल म्हणून....
कधी कधी येते का ग माझी आठवण....
आठवतात का तुला कधी ते क्षण....
खरंच सांग...
की विसरलीस सारं आणि हरवलं तुझ्यातलं माझं मन....